Skip to Content

smarNaIya sTaana dSaQna  

सर्वज्ञांच्या संबंधित महत्त्वपूर्ण स्थानांचा भौगोलिक सचित्र आढावा...


स्थान ग्यालेरी


 हे बोल अंतरीचे...


परमार्गातील असन्निधानस्थित साधकांसाठी ईश्वरस्मरण ही प्रमुख साधना आहे. स्मरण म्हणजे आठवण. चतुर्विध स्मरणातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे लीळास्मरण. उत्तम लीळास्मरण होण्यासाठी जसे श्रीमूर्ती, वस्त्रे, अलंकार,काळ, परिवार, पदार्थांचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच त्या लीळेच्या स्थानाच्या भौगोलीक  परिस्थितीचे ज्ञान असणे देखील तितकेच आवश्यक आहे. जसे की लीळा घडत असताना सर्वज्ञांचे कुठे अवस्थान होते, कुठे आसन होते, ओट्यावर होते, की मंदिराच्या चौकात होते, की वृक्षातळी होते इत्यादि. या ज्ञानाच्या  अभावी लीळेचे तरंग आपल्या स्मृतीपटलांवर येणे असंभव आहे. क्रांतदर्शी पूर्वजांना या गोष्टीची  जाणीव असल्यामुळे लीळाचरीत्र पाठांमध्ये बऱ्याच स्थानांची भौगोलीक माहिती पूर्वजांनी नमुद केलेली असते, तर विस्तृत भौगोलीक माहिती आपल्याला स्थान पोथ्यांमधून आढळते. या माहितींच्या आधारे सर्वज्ञांच्या महत्त्वपूर्ण अश्या ३० अवस्थान, महास्थानांचा भौगोलीक आलेख, त्रिमितीय चित्रांच्या व ध्वनिमुद्रित चित्रफीत (video) च्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक स्थानाच्या लीळेचा निर्देश सुद्धा लीळाचरीत्रानुसार व स्थानपोथीनुसार केला आहे. काळाच्या ओघात, विविध दृष्टादृष्ट कारणांमुळे बरेचसे संबंधीत स्थाने नामशेष झाले. त्या स्थानांच्या वंदनाच्या अभावामुळे, व अप्राप्तीच्या अभावामुळे,त्या स्थानांचे व तेथील लीळांचे विस्मरण होणे, निल्लळता येणे सहज शक्य आहे. तसे होऊ नये व अनुपलब्ध झालेल्या स्थानांच्या वंदनाचा योग नाही, परंतु आठव तरी रहावा,मुमुक्षु साधकांना लीळेचे चिंतन, पठन करताना ती लीळा कुठे कशी घडली असेल , याचा स्थूलमानाने अनुभव व्हावा व उत्तम स्मरण घडावे इतुकेयासाठी​
निस्वार्थ भावनेने परमप्रीतीस्तव केलेला हा अट्टाहास....!!