Skip to Content

Sae/duNaIQ

 

शेंदुर्णी स्थाने.

 

शेंदुर्णी स्थाने

गोपाळाचे देउळ | सेंदुरणी गोपाळीं अवस्थान : नै पूर्वे गावांतु वड : त्या वड़ा अज्ञे वाटते वाटे दक्षिणे गोपाळाचें देऊळ पूर्वाभिमुख एकी वासना पश्चिमाभिमुख : त्याचे चौकीं अवस्थान: दिस १० : 

हे रामेश्वरबा: हिराइ दिस २० : परशरामबा दिस २० तथा १२ : आंगणी मादनें स्थान : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : एकी वासना उत्तराभिमुख: दारवठा सोंडीया २ : पाइरीया ४ : पश्चिमे खिडकी : 

"तिकडेचि' परिश्रय एकी वासना दक्षिणे परिश्रय : जगतीआंतु दुसरी देउळी उत्तराभिमुख तिचे पटिसाळे आसन : तेथ १. गौराइसां भेटि २. देमाइसां भेटि ३ लखुबाइसां भेटि ४ उपाध्यां भेटि ५. विष्णुभटां भेटि 

तेथौनिचि पद्मनाभी पाठवणी : । :


लिंगाची देउळी, दक्षिणेश्वर । गोपाळा नैऋत्यकोनी नैचिये थडीयेसि लिंगाची देउळी उत्तराभिमुख : तेथ आसन : गावा दक्षिणे दक्षिणेश्वराचें देउळ उत्तराभिमुख : 

एकी वासना पूर्वाभिमुख चौकीं आसन: जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : देउळा इशान्ये वड : त्या वडाखाली आसन एवं सेंदुरणी ।।


 3D video released...!!

  शेंदुर्णी 3D video.

https://youtu.be/bl44K4ZFeus