ihvarLI (jaalnaa)



हिवरळी स्थाने
वनदेव, लिंगाचें देऊळ । तेथौनि गोसावी हिवरळीयेसि बीजें केलें : हिवरळीये राजमठीं वसति जाली : एरे दीसि गोसावी उदेयांचि वनदेवासि बीजें केलें : शोध : गावा पश्चिमे वनदेवाचें
देउळ उत्तराभिमुख : चौकासी दारें २ : जगतीसि दावठें २: एक उत्तराभिमुख : एक पूर्वाभिमुख : उत्तरेचेया दारवठेनि रिगतां डावेया हाता लिंगाची देउळी :
तेथ देउळीया ३ दक्षिणाभिमुख : तिये देउळीये आसन : एकी वासना उत्तरेचे देउळीये आसन : तेथ बीजें करीता " मार्गी दादोसि विनविले' : हिराइ वासना वनदेवासि बीजें कराता
तेथ दादोसी विनविले तेथौनि वहाना सांदु जाणें :
शोध : वनदेवी देवां शिष्या भेटि :: वनदेवाचां चौकीं आसन भितरी नासी दारशंका : गोसावियांसि पूर्वेचेयाकडे पाटसरेयावरी आसन तेथ वायनायका भेटि पटिसाळे आसन :
मढावरी बीजें करणें लिंगाचे देउळीं पूजा : आरोग पहूड : उपहूड जाला : तथा उमाइसाची भेटि मग विळीचा वेळी सर्वज्ञे म्हणितलें 'आता ग्रामांतर न किजे' : "
मग राजमठासि बीजें केलें गोसावियांसी तेथ अवस्थान जालें मास २ :
नृसिंहमढ ( राजमठ ) । शोध : दुर्गा दक्षिणे गावांतु नरसिंहमढ : तयाचें महानुभावी नाव ठेविलें राजमठू : तो राजमठू उत्तराभिमुख : एकी वासना पूर्वाभिमुख :
पूर्व- पश्चिम पुढील पटिसाळ : भितरी दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा एकी वासना आंतुलीकडे पश्चिमे एकी वासना उत्तरेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा तेथ अवस्थान मास २ :
मढ पश्चिमाभिमुख : आंगणी मादनेंस्थान जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख पश्चिमे खिडकी भितरी पूर्वाभिमुख खांड' सोंडीया ४' : तथा उत्तर - दक्षिण सोंडीया रिगतां डावेया
हाताचिये सोंडीयेवरी आसन: दक्षिणेचे सोंडीयेवरी दिवाळी सणीचें मादनें उतरतिया पाइरीया ५ तथा ४ तथा पूर्वेचे सोडीयेवरी गोसावी चरणचारी उभे असति :
तेथ आपलो भेटि पटिसाळे रिगतां उजवेयाकडे आसन : तेथ लखुदेवबा भेटि तुळसीया भेटि पटिसाळे रिगतां डावेया हाता वायनायकाची भेटि पटिसाळे रिगतां उजवेया हाताकडे
महादाइसां भेटि एकी वासना मढ पूर्वाभिमुख पुढें उत्तर-दक्षिण सोंडीया २ : रिगतां डावेया हाताचिये सोंडीयेवरी विळचाचें मादनें रायांगणी पांडा पाचां लिंगाची देउळी उत्तरेसी
दक्षिणाभिमुख सोंडीये उत्तरे पांडा ३ वृंदावन इशान्ये परिश्रय रायांगणा पश्चिमे पांडा १० नारायणाचा मढ उत्तराभिमुख: एकी वासना पूर्वाभिमुख : उत्तरे खिडकी :
तेथचि पर्हीवा तथा बोंडणवावी :
पाणिबारे, महालक्ष्मी, गणेश, महादाइसा अनुवर्जन । गावापूर्वे पाणीबारें : त्यासि पूर्वे मळेयांतु एकी वासना पाणीबारेया दक्षिणे पांडा २० मळा तया मळेयांतु महालक्ष्मीचें देउळ
पूर्वाभिमुख : शोध ते एकविरा : दुसरें गणेसाचें देउळ : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख: महालक्ष्मीचेया देउळा उत्तरे पांडा १० भटां महादाइसाचें अनुवर्जन ::
:
सिद्धनाथ । गावा इशान्ये नै पैलाडी सिद्धनाथाचें देउळ पूर्वाभिमुख' : त्याचे चौकीं आसन :
संगेमेश्वर, रामनाथ । गावा वाव्यकोनी खालीली संगमी संगमेश्वराचें देउळ उत्तराभिमुख : तेथ नैचिये थडीयेसी रामनाथाचें देउळ पूर्वाभिमुख: एकाचेया वासना काचराळें
हिवरळीचें विहरणस्थान |
3D video released...!!