iBa/gaar


3D video released...!!
भिंगार स्थाने
आदित्य, नारायण । भिंगारी आदित्यीं अवस्थान दिस १० : एकी वासना १५ : उत्तरार्धी अवस्थान दिस २० : भिंगारी गावाआंतु दुर्गा दक्षिणे आदित्याचें देउळ पूर्वाभिमुख : तोचि उंबरवट' :
भितरी दक्षिणेचे भिंतीसि पूर्व-पश्चिम वोटा : तया वोटेयावरी अवस्थान आंगणी मादनें स्थान : त्याचि पश्चिमे भाइदेवां लघुनीति : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख पश्चिमे खिडकी :
तिकडेचि देउळा पश्चिमे परिश्रय : जगतीआंतु 'आदित्या' दक्षिणे नारायणाचें देउळ पूर्वाभिमुख °तोचि उंबरवटु : चौक : लक्ष्मियां पाठीं पाठीं देउळावरी बीजें करणें : आदित्या उत्तरे भिडीं आसन :
जगतीबाहिरी आदित्या दक्षिणे बडवेयाची घरें : तेथ बीजें करणें : हाटवटी पूर्वाभिमुख :
भिंगारदेवी । गावा दक्षिणे भिंगारदेवीचें टेंक : त्या टेंकावरी भिंगारदेवीचें देउळ पूर्वाभिमुख : चौकीं आसन : तेथ उपाध्यां विष्णुभटां भेटि : भिंगारदेवी उत्तरे 'टेक' उतरतां पंचमवेदु निरुपणें :
भिंगारदेवी उत्तरे साधां अनुवर्जनें : त्यासि पूर्वे नगरमहाद्वार
पूर्वे टेंकावरी भिंगारदेवी : तेथ चौकीं विहरणस्थान : उपाध्यां विष्णुभटां भेटि तेथचि : टेंक उतरतां उत्तरे पंचमवेदु : तयाचि टेंका उत्तरे साधां अनुवर्जित बीजें करणें : हे स्थान उत्तरार्धी :
महालक्ष्मी, एकवीरा, गणेश । गावासि वायव्येकोनी महालक्ष्मीचें देउळ पूर्वाभिमुख : एकवीरा पूर्वाभिमुख : गणेसाचें देउळ पूर्वाभिमुख : शोध : ए तिन्हीं देउळें एकेचि जगतीआंतु :
जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : ए तिन्ही देउळें पाणीबारेया पश्चिमे : तिकडेचि खिडकी :
सोमनाथ, आदित्य । गावासी इशान्येकोनी एकी वासना
सोमनाथाचें देउळ पूर्वाभिमुख : तथा ते एकविरा : एवं भिंगार' : ।।
उत्तरार्ध
भिंगारी आदित्यीं अवस्थान : गावांतु आदित्याचें देउळ पश्चिमाभिमुख : भितरी चौकीं अवस्थान जालें : दिस २० : आदित्या पश्चिमे नारायणाचें देउळ पश्चिमाभिमुख' :
गावा अज्ञे भिंगारदेवीचें देउळ टेंकावरी पूर्वाभिमुख : चौकीं आसन : त्यासि नैऋत्यकोनी उतरतां विसेख ४ :