jaaegaeSvarI



जोगेश्वरी स्थाने
जोगेश्वरी । जोगेश्वरी स्थान प्रशंसा : जोगेश्वरीचें देउळ पूर्वाभिमुख : मग गोसावी जोगेश्वरीचेया देउळासी बीजें केलें दोन्हीं द्वारशंका धरुनि गोसावी भितरी अवलोकीलें :
मग तेचि पटिसाळेसि नावेक आसन जालें उत्तराभिमुख : तेथ उमाइसां अवडळभटां भेटि उंबरवट चौक जोगेश्वरी दक्षिणे लिंगाची देउळी पूर्वाभिमुख तेथ उमाइसां अवडळभटां
सारस्वतकाळ प्रशंसा' चौकीं आसन : जोगेश्वरी आणि लिंगाचीये देउळीयेमध्यें संदी :
नारायण । जोगेश्वरी वायव्ये नारायणाची देउळी पूर्वाभिमुख : तेथ आसन : जोगेश्वरी अवस्थान मास १ जगतीचा दारवठा उत्तराभिमुख: दारवठा तिवाड़ी भायें दर्शन पाटीये श्रीकरु
लावणें तेथचि' 'मातांगा दरीसन' दारवठेयाचिया पाइरीया ३ : उंबरवट दारवठेयांतु रिगतां उजवेया हाता सीळ : एकी वासना महालक्ष्मीये दक्षिणे पौळीवरुनी सीळ वानें
जगतीसि उत्तरे दुरी नाथोबा भेटि :
गुंफा । जोगेश्वरी मागें जगतीआंतु सैंग पटिशाळ उत्तर-दक्षिण पूर्वाभिमुख: खांबा सोळावरी उभविली : 'देउळाचा वायव्यकोनी ते पटिसाळेचे सिरां उत्तरेचे सेवटीं दो खणामाजी
एका खणाची गुंफा उत्तराभिमुख भितरी दक्षिणेचे भिंतीसीं मध्यें पूर्व-पश्चिम वोटा पूर्वाभिमुख तया वोटेयावरी अवस्थान मास १ : हिराइ दिस २० अनुमान एकी वासना दिस ११ शोध
दिस १५ तया वोटेयावरी विसेख ११ : पुढीला खणाचें आंगण' : आंगणी पश्चिमिली सिरां मादनेंस्थान : देउळाचिये उत्तरीली पडसाउलिये आसन गुंफा चोखट करीति तवं :
तेथचि उमाइसा अवडळभटां भेटि' : गुंफेचे पटिसाळे 'वेढे करीतां" आउसा भेटि : आंगणी विसेख १० : देवां भटां भेटि महादाइसां भेटि गुंफेसी देमाइसां भेटि :
एकाइसा भेटि उत्तरे तिवाडीभार्ये दारवठेयापासी तिवाडी भार्या भेटि"
एकी वासना दक्षिणाभिमुख आंगणी मादनेयाची शीळा : जगतीचे पूर्विले" भिंतीस खिडकी खिडकीये पश्चिमे पांडा १० पाउल पाउलां निधान कथन' :
त्यासि नैऋत्यकोनी परिश्रय: तिकडेची साधां भेटि : साधाचा नमस्कारु शोध : जगतीबाहिरी पश्चिमे भीडीं आसन तेथ जाखुबाइसां भेटि : वेखु परिहासु : तेथचि साधांची भेटि
महालक्ष्मी । जगती उत्तरे" बाहिरी पांडा ४ गावासीचि पश्चिमे महालक्ष्मीचें देउळ पूर्वाभिमुख : शोध : तें एकवीरेचें देउळ : एकी वासना तेथ जिव्हारोग माळीण रक्षण
भेडवणे । महालक्ष्मीयेसि उत्तरे सेत : तेथ नाथोबा सेणी वेचितां भेडवणे :
नागिणी, साधा पाणिपात्र । बाहिरीला पाटसरेयावरीं आसन तेथ नाथोबाकरवी २ पटिसाळे आसन राउता विस्मयो
नागीण खेळवणें
पटिसाळेचे सिरां साधासी पाणीपात्र देणें : गुंफे दक्षिणे
गणेश । जोगेश्वरी अज्ञे गणेसाचें देउळ : संगमी आउ पवन गुरु एवं जोगेश्वरी :
3D video released...!!