inaYaIvaasaa (naevaasaa)
महानुभाव पंथीय 'नेवासा' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक सचित्र आलेख नकाशा.



निवासा स्थाने
कणेरेश्वर कुमारेश्वर | मग गोसावी कणेरेश्वरासी बीजें केलें तेथ चौकीं आसन जालें : मग गोसावी कुमारेश्वरासि बीजें केलें त्याचे चौकीं आसन जालें :
कुसुमेश्वरूनि येतां पुढां मंडळीकात पाठवणे :
घाट, अनिष्टीका । पुरादित्या वाव्यकोनी घाट तें घाटीं आसन वायव्यकोनी पेहेरेचिये थडीयेसी अग्रीष्टीका पूर्वाभिमुख : तेथ आसन :
पुरादित्य । 'निवासा' पुरादित्य अवस्थान मास ६ एकी वासना मास ५ : दिवाळीये पासौनि सिमुगा आंतु : पुरादित्याचें देऊळ पूर्वाभिमुख चौकीं आसन : तेथ विसेख १३ :
भितरी दक्षिणेचे भिंतीस पूर्व-पश्चिम वोटा उत्तराभिमुख 'अवस्थानाचा' तेथ विसेख १६ : पुढे आंगण चातुर्दक्ष: आंगणी विसेख ६ :
आंगणी मादनेंस्थान : 'पुढें' देउळाची पटिसाळ उत्तर-दक्षिण पूर्वाभिमुख : पटिसाळे जोतें: पटिसाळेसि पाइरीया ४: पटिसाळे विसेख ६ भेटि ४ उंबरा : कवाडें :
जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : एकी वासना उत्तराभिमुख् दारवठा पाइरीया जगतीबाहिरी पश्चिमे पश्चिमाभिमुख आसन भटोबासाकरवी होडे गुंडे टाकवणें
नारायणमढ । पुरादित्या अज्ञे जगतीआंतु नारायणाचा मठु उत्तराभिमुख पुढां पटिसाळ पूर्व-पश्चिम उत्तराभिमुख चौकीं आसन तेथ विसेख ३ : तेथ भक्तिजनाचें बिढार ::
बडव्याचे घर, मार्तंडा चोरी, संतोषाचा सातरा । मढा दक्षिणे पौळीबाहिरी बडवेयाचें घर तेथ आसन: दक्षिणेचे पौळीसीं खिडकी ते खिडकीये पश्चिमे बडवेयाची कडबेयाची वळ्हे
तेथ मार्तंडाची चोरी तिकडेचि परिश्रय तथा उत्तरेच्या दारवठेया पूर्वे वोता आश्राइत परिश्रय' : पूर्व-पश्चिम राजबीदि: ते राजबीदि दक्षिणे वड : त्या वडातळीं कापडमांडवी :
तेथ गोसावी बीजें केलें त्या वडाखाली संतोषाचा सातरा :
नाथोबा सातरा, संगमेश्वर, सौंदराचे देऊळ, कपाळेश्वर । गोपाळाच्या देउळा पश्चिमे राजबीदीसि नाथोबाकरवी सातरा घालवणें तथा देउळापुढें थडीयेसि :
त्यासि दक्षिणे संगमेश्वराचें देऊळ पूर्वाभिमुख तेथौनि यात्रा अवलोकणें तथा यात्रा आकर्षणें : त्यासि दक्षिणे सौंदराचें देऊळ पूर्वाभिमुख: त्याचे चौकीं आसन : विहार :
जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख त्यासि दक्षिणे कपाळेश्वराचें देउळ पूर्वाभिमुख : चौकीं आसन विहार जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख :
वहारदेव, म्हाळसा, संतोष सातरा, बाइसाचा विरक्त, गोपाळमढ । पेहेरेचे पश्चिमिले घार्टी पाइरीया ७ तेथ वहार देवाची देउळी तेथ आसन एकी वासना तेथ गोसावी चरणचारी'
उभे असति: पुढां वाळवंट म्हाळसेचें देउळ पश्चिमाभिमुख' : तोचि उंबरवटु' : पुढां पटिसाळ पश्चिमाभिमुख : भितरी चौकीं आसन : हे रामेश्वरबा: उत्तरेचां खातां आसन
हे परशरामबा' :: 'तेथ' बडवेनि पूजा केली जगतीचा दारवठा दक्षिणाभिमुख: दारवठा माड तीं खणाचें : ते माझारीले खणीं आसन : तेथौनि सिमुगा सिंपणें अवलोकणें दुसरा
जगतीचा दारवठा पश्चिमाभिमुख : तयापुढें वाळवंट विसेखाचें : म्हाळसेचा घाट पटांगणे सा : पाइरीया ५६ : रिगतां पहिलियाची पाटांगणावरी संतोषाकरवी सातरा घालवणें हे
रामेश्वरबा : परशरामबा: बाइसांचा विरक्त वाळवंटी दाखवणें तेथचि घाटीं आसन : तेथचि म्हाळसा संबोखु : जगतीचेया पश्चिमिलिकडे दारवठेयांतु मढ :
तो गोपाळाचा उंबरा भितरी उतरतिया पाइरीया ७ चौकीं आसन : मढापुढां रासेचें माड : त्यास पश्चिमेच्या पाइरीया ४ : उत्तरेच्या पाइरीया ४ : दक्षिणेच्या पाइरीया ४ : मार्ग :
मढाचा उंबरा । उतरतिया पाइरीया ५ : आंगण चिरेबंद : ।
एकौर मांगळौर । 'वाळवंटी उत्तर-दक्षिण पूर्व-पश्चिम हाटवटी : तेथ ग्राहीक वेखें सकळ पदार्था संबंध देणें । तथा नाथोबाकरवी वाळवंटी येळौर मांगळौर म्हणवणें :
म्हाळसेच्या जगती वायव्यकोनी वाळवंटी साइंदेवा भेटि ते पुरोहितद्वारें रायाचिये आंघोळीसि आले होते : तें इंद्रोबाचे मामे तेहीं आपणेयावरी लोहवी छत्री धरविली असे तेहीं
गोसावियांसी केळे दर्शना केलीं : पांच एकी वासना ७ तेयाखाली वानिया गांधिया मोती वानिया कासाराची सवदागरांची देशाउरियांची बिढारें असति तेथ गोसावी बीजें केलें
तयाचेया सकळ पदार्थासि ग्राहीकवेषें संबंध दिधला एकी वासना संतोषा देहावसान :
पिंपळेश्वर | गोपाळबासांचिया वासना पेहेरेचिये पश्चिमिलीये थडीयेसि
पिंपळेश्वराचें देउळ पूर्वाभिमुख जगतीस दारवठें २ : एक पूर्वाभिमुख एक उत्तराभिमुख: पुरादित्यीं महापूजा महाकाळी एवं निवासें : ।।
3D video released...!!