navagaava


नवगाव स्थाने
विंझुगा
आदित्य । विंझुगा आदित्यी अवस्थान : नवगावा इशान्ये विंझुगा : तेथ आदित्याचें देउळ पश्चिमाभिमुख : एकी वासना पूर्वाभिमुख उत्तरेचे भिंती पूर्व-पश्चिम वोटा करविला :
मग तया ओटेयावरी अवस्थान जालें : दिस २० : एकी वासना दिस १५ : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख' :
महालक्ष्मी । आदित्याचेया देउळा दक्षिणे एकी वासना अज्ञकोनी महालक्ष्मीचे देउळ पूर्वाभिमुख : पुढें पटिसाळ उत्तर-दक्षिण पूर्वाभिमुख : महालक्ष्मीये पूर्वे टेंक :
आदित्याचें आंगणी मादनेंस्थान :
ब्रह्मप्रकाशीका । दोहीं देउळाचिये संदीसी अवधुताचि' ब्रह्मप्रकाशिका 'अनुवाद' पूर्वाभिमुख' जगतीची खिडकी : आदित्या उत्तरे अडु : अडा पश्चिमे पांडा ७ निंबु :
तेथ पिंगळे 'प्रशंसा' :
आवार । अडापूर्वे पांडा १० एकी वासना अडा अज्ञे पांडा २० ब्राह्मणाचे घर, आवार
पूर्वाभिमुख :
वनदेव । अडा इशान्ये वनदेवाचे देउळ उत्तराभिमुख: पुढा चौक : एकी वासना आदित्या इशान्ये वनदेवाचे देउळ उत्तराभिमुख : त्यासि इशान्ये दोन्ही निंब : वनदेवा उत्तरे परिश्रय एकी वासना वनदेवा वायव्येकोनी परिश्रय :
ब्रह्मनाथ । आदित्या पूर्वे पांडा १०६ ब्रह्मनाथाचें देउळ पूर्वाभिमुख ।
ओहळ । आदित्या पश्चिमे पांडा ३० ओहळ : तेथ राणाइसा : लाखाइसा भेटि : एवं विंझुगा: ।।
3D video released...!!