imarI
महानुभाव पंथीय 'मिरी' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक सचित्र आलेख नकाशा.

मिरी स्थाने
मिरीये महालक्ष्मी अवस्थान गावा दक्षिणे महालक्ष्मीचें देउळ पूर्वाभिमुख हे रामेश्वरबा गावा इशान्ये हे परशरामबा तथा गावा पश्चिमे मळेयांतु महालक्ष्मीयेचें देउळ पूर्वाभिमुख
भितरी दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा उत्तराभिमुख : तया वोटेयावरी अवस्थान दिस २० वोटा विसेख ९ चढतिया पाइरीया ७ : आंगणी मादने स्थान जगतीचा दारवठा
पूर्वाभिमुख : जगती नैऋत्यकोनी परिश्रय : एकी वासना वायव्यकोनी परिश्रय देउळा इशान्ये दूरी अज्ञिष्टीका पूर्वाभिमुख तेथ आसन ।
मिरीये पुढें मार्गी साधातें पुढें पाठवणे मार्गी साधातें वाहाणा लेववणें ।
3D video released...!!