Skip to Content

DaemaegaaXma

 

Mahanubhaav panth, sthan nakasha of Domegram.
महानुभाव पंथीय 'डोमेग्राम' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक  सचित्र आलेख नकाशा. 
डोमेग्राम 
overview.
डोमेग्राम 
स्थाने.
डोमेग्राम 
लीळा संदर्भ.
डोमेग्राम 
लीळा संदर्भ.

 

डोंबेग्राम स्थाने

नृसिंहमढ । मग गोसावी डोंबेग्रामासि बीजें केलें : गावांतु तीन मढ : एकु पूर्वाभिमुख : एकु उत्तराभिमुख : एकु दक्षिणाभिर्मुख : तो राजमढु नरसिंहाचा : तो काष्टाचा मढ : 

खांबा २४ वरी उभिला' : भितरी पश्चिमेचे भिंतीस उत्तर- दक्षिण वोटा : तया वोटेयावरी अवस्थान : मास ६ : बाहिरीले पटिसाळेसि पश्चिमेचे भिंतीस उत्तर-दक्षिण वोटा तया 

वोटेयावरी आसन : राजमढाचें जोतें दों थराचें : मुरबाळेया पाषाणाचें : भितरीला वोटेयावरी विसेख ३३ : आणि सात वस्त्रपूजा : ।: भटीं रेइनायकाचें वस्त्र एक मागितलें : 

ते वस्त्र गोसावियांसी ओळगविलें : पूजा आरोगणा जाली : पूजा विलक्षण : वोटयाखाली प्रार्धबाइसा भेटि : तेथ प्रार्धबाइसां देव निरुपण : वोटेयावरी म्हाइंभटां भेटि : 

वामन मतीविळासा भेटि :: वोटेयापुढां खांबु : मढापुढें सोंडीया सरुंदा दिर्घा विसेखाचिया : खाली पाइरीया ३ : मढांतु इशान्यकोनी गोसावियांची पिक पडिली होति ते 

बाइदेवोबासीं जीभा चाटुनि घेतली : मढाच्या उंबरेयावरुनि येतां जाता आंगणासि श्रीचरणी उपान्हो लेववणें हा उपासनेयाचा विधी :: वोटेया पुढीला खांबापासि आरोगणास्थान ।

सरालेकरा महाजना भेटि ::


पटीशाळा । पटिसाळेचेया वोटेयावरी म्हळाइसां भेटि पूजा विनति करणें तेथचि जिव्हाडागु श्रवणें भटां मार्तंडा क्षिर भोजन करवणें । पटिसाळे महादाइसां मालगंठी वेढे : 

तेथचि "न भिया हो साधें हो" म्हणणे : तेथचि कव्हणा एकाची भेटि : वोटेयावरी आसन: विद्यावंता निवारणी भटां कोप: । कदाचित भक्तिजनाकरवी पाळीया करवणें । 

पटिसाळेवरी पश्चिमेचा सिरां सिहाडा वोलणी होति : तेथ वस्त्रे ठेवणें रिगतां उजवेया हाता आसन तेथ पिंपळे वामनभटाचा उपहार : भितरी रिगतां पटिसाळे उजवेया हाता खांबु 

त्या खांबाची मदळसा गोसावी श्रीकरें धरुनि दक्षिणाभिमुख उभया राहुनि साधा अभयदान देणें तेथौनिची महाजना पाठवणी देणें :| :


सोंडी । रिगतां उजवेया हाताचिये सोंडीयेवरी रंगमाळीका महादाइसाचिया तेचि सोंडीवरी दाको दर्शन गोसावी म्हणितलें "कां गा दाकेया निरोध जाला मां! सीनलेति!' निकेनि की!

" सर्वज्ञे म्हणितलें : "हे आवघे दाभणाचे गोणटे असति : " तवं दाकोने म्हणितलें : "हें मी जाणतो जी " मग तेणें गोसावियांपासि जाडीची घडी ठेविली गंगावण : चवरी : 

तीसि पोकळ लोहाची दांडी ते गोसावी श्रीकरीं घेतली पोफळफोडणा तो सांकळीचा : : तयासि गोसावी पांती प्रसादु दिधला तो रायाचा शस्त्र विदानि मग तेणें तो उद्यमु सांडीला

: । : रिगतां उजवेया हाताचिये सोंडीयेवरी खांबाचा तोळंबा होता : तेयाचीं चक्रे केलीं : 


राजमढा आंतु रिगतां उजवेया हाताची सोंडीये पूर्वे मादनेस्थानाची सिळा : ।: राजमढाचिया सोंडीया २ : पाइरीया ३ तथा उंबरेयावरुनि येतां जातां दायंबा जवळीक निरुपण: 

महादाइसाचिया रंगमाळीका पटिसाळेसी विलक्षण पूजा : भक्तिजनाचें क्षेउर दिवसीं ताक दिवा पूजा वोवाळणी आरोगण : 

रायांगण । नव हात रायांगण ते रायांगणी १ दायभागवतां भेटि २. भूतानंदा भेटि ३. आबाइसां भेटि ४ लाखाइसां भेटि ५. देवां महादाइसां भेटि ६. हरीभटां भेटि आंगणी मालगंठी 

वेढे आंगणी कांडण एकी वासना नाथोबा पुष्टी आरोहण होउनि आंगणी वेढे :


उंचमठ । आता राजमढा दक्षिणे उंचमढु उत्तराभिमुख : तो पाखाणाचा खांबा २४ वरी उभिला : पुढें पटिसाळ उत्तराभिमुख : तो मढ नारायणाचा त्यासि पाइरीया ७ तथा ५ 

सोंडीया दोनि मढामध्यें रिगतां डावेया हाताचिये सोंडीवरी आसन ते विसेखाची तिये सोंडीयेवरी आडीया २ उंचमढ तो भक्तिजनांचें बिढार :1: चौकाच्या दों खांबामध्यें आसन 

: उंचमढीं महात्मा अशक्त होता तयातें पडिताळणें तेथचि मार्तंडा झोळी दर्शन दुसरें नारायणा मागौनि झोळी लखुबाइसां भांडण : गोसावी मढावरी बीजें केलें ::

मढाचे वायव्यकोनी दादरा तेणें दादरेनि मढावरी बीजें करीति: त्या मढावरी दक्षिणेचे भिंतीसीं आसन : तेथचि भिंतीसीं दक्षिणाभिमुख चरणचारी उभयां राहुनि भटांची वाट पाहाणें

उंचमढाच्या पुर्विला सिहाडेनसीं आसन : तेथचि भटांकरवी उडीया घालवणें राजमढावरुन उंचमढातु रिगतां उजवेया हाताचिया सिहाडेयापासी लघुपरिश्रय


केशवमठ । उंचमढा दक्षिणे केशवमढु पूर्वाभिमुख भितरी दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा उत्तराभिमुख तया वोटेयावरी उताणेया पहूड होए तो मढ खांबा १६ वरी उभिला: 

तोहीं काष्टाचाचि । पुढें पटिसाळ खांबा आठावरी उभिली । तिये मढीं महादाइसाचा श्वेतोपहारु :: तेथचि वोटेयावरी उदास्य परिहारु | उंचमढा आणि प्रसन्नमढामध्यें संदी हात दीढ

ते संदीसि लघु परिश्रय । तेथचि उदका विनयोगु : राजमढा आणि उंचमढामध्यें पश्चिमेचें "जगतीचे' भिंतीसीं खिडकी एकी वासना तेथ आउसें जोगवटा घालुनि बैसल होति :

पौळीचां इशान्यकोनी जगतीचा पहीवा पूर्वाभिमुख तेथ भिक्षान्न सांडनि नाथोबा निरुपण तया पश्चिमे उदका विनियोग: एकी वासना उंचमढा पश्चिमे जगतीबाहिरी लघुपरिश्रय 

परिश्रयस्थानें दोनि एक उंचमढा नैऋत्यकोनी भटांचें स्थान : एक उंचमढा दक्षिणे । मादनें होतां विंगुळी निगाली ते कापडें धरविली : पुन कापड लवकरी न येचि गोसावी दिगंबर 

प्रवृत्ती स्वीकरुनि 'उदासमढासी' बीजें केलें : श्रीप्रभु प्रकाश : 


दारवठा, सुयेर । जगतीचा दारवठा दक्षिणाभिमुख: त्याचा उंबरा दारवठा विसेख ४: दारवठा पटिसाळ सैंग उत्तराभिमुख मध्यें वाट वाटे पूर्वेची पटिसाळ सानी खांबा चौ वरी 

उभिली तेथ आसन विहार: ते पटिसाळे नाथोबाकरवी सुयेर करवणें ते बाइको बाइसासी निरोविली तियेतें गोसावी येतां जातां सांभाळीति । एकी वासना जगतीआंत दारवठेया 

उत्तरे माळवध : तेथ सुयेर करविलें । दारवठेयाचें वाटे पश्चिमेची पटिसाळ खांबा ८ वरी उभिली : ते तीं खणाची होति तिचां मधिलां खणी कहीं कहीं आसन होए तथा दारवठेयातु 

रिगतां उजवेया हाता 'जगतीचिये भिंतीसीं' उत्तर-दक्षिण पटिसाळ पश्चिमाभिमुख : ते पटिसाळेवरी गोसावी वेढे करीति : माध्याने रात्रीं गोसावी पटिसाळेचिये फांजीवरी बीजें करीति:

तेथ उभे राहाति । रामनाथुनि तिंबत येणें तै ते पटिसाळे वस्त्रे वेढणें । दारवठेयापुढें च्याऱ्ही दिसा अवलोकणें :


कान्हनायकाचा आवार । आता उंचमढा अज्ञे कान्हनायकांचा आवारु पूर्वाभिमुख : तेथ विहारु :


रेइनायकाचा आवार । प्रसन्नमढा पूर्वे पांडा १५ तथा जगती बाहिरी पांडा २० रेइनायकाचा आवारु पूर्वाभिमुख : आवाराचा दारवठा पूर्वाभिमुख : भितरी दोनि चौकींया एक 

उत्तराभिमुख : एक पूर्वाभिमुख एकी म्हणेति माळवध उत्तराभिमुख : त्यासि पुढें पटिसाळ : भानवसाची चौकीं पूर्वाभिमुख : चौकींये पूर्वे आंगण : आंगणी पानवै : 

ते पानवैवरी वृंदावन : आंगणी मादनें : चौकीये इशान्ये घोडवडी । दारवठेया समीपचि गोठा : ।: आवाराचे पश्चिमिली भिंतीस खिडकी पूर्वाभिमुख : मढाचीये जगती पूर्वे

रेइनायकाचेया आवारा पश्चिमे दोहीमध्यें मार्ग : ते मार्गी नाथोबासाचा प्रसंगु' : रेइनायकाचे दोनि च्यारी उपहार : थोर करण मांडे तेधवा बाइसें महादाइसें विसरे नाहीं म्हणौनि 

रेइनायकाचे आवारीं करण करीति । रेइनायकाचां आवारीं विसेख ६: आवारा उत्तरे मार्ग ते मार्गी गहवारे बाइकोची विनवनि स्वीकारु :


वेसद्वार, गुंडेवरी घेववणे, अग्निष्टीका । डोंबेग्रामीचें वेसिद्वार उत्तराभिमुख तया पश्चिमे पांडा ४ हनमंताचें धाबें त्यासि जवळीचि मोटा मार्ग : वेसी इशान्ये पांडा १० खांकरीया पिंपळ

तया पिंपळातळीं आसन तेथ भटोबासा स्थीति जाली : ते पिंपळावरी वेंघले : त्यासि गोसावी गुंडेवरी घेवविलें हे गोपाळबा वासना : तो पिंपळ चातुर्दक्ष नमस्करणिये ।: 

त्या पिंपळा पूर्वे पांडा ४ दुसरा पिंपळ : तयापासि आसन तेथ भट बुकीयावरी घेववणें त्या पिंपळा पूर्वे पांडा ५ अग्निष्टीका अग्निष्टीके पूर्वे पांडा ५ बादाठाणीचेया दाईभागवता भेटि :

: छिन्नपापुनि येतां गावासि पूर्वे चांदोवा धरणें । अग्नीष्टीके पूर्वे एकी वासना पश्चिमे पांडा ८ गलमाचा पिंपळ तयातळीं आसन :


डोंबाइ । हनमंता पश्चिमे डोंबाइचा मार्ग गावासी वाव्यकोनी डोंबाइचें देउळ पूर्वाभिमुख पुढें उत्तर-दक्षिण पटिसाळ सानीचि : जोगदंड हा विसेख आंगणी : सोरठी जाडी हा 

विसेख आंगणी पाइरीया ३ : देउळा पुढें समग्र आंगण : आंगणा दक्षिण विभाग आसन डोंबाइचा चौकीं आसन तवं साधें गंगेकडौनि आली : तथा साधासि आंगी देयावया 

अभिमुखता नाथोबा पुष्टी आरोहण होउनि आंगणी वेढे : पटिसाळे खालिले विभाग आसन तेथ साधाचा कंटक फेडणें तथा पटिसाळेसीचि देउळा भितरी डोंबाइ दक्षिणे 

अवस्थान दिस १० : हे रामेश्वरबा । पटिसाळेसि जुंबाड भय निवृत्ती :: तेथचि साधातें प्रतिति पुसणें : तेथचि नरसिंहअनुभवदेवभटां भेटि तेहीं म्हणितलें "जी जी एक आमचा मार्ग 

असे दक्षिण दिसेसि :: डोंबाइ पश्चिमे परिश्रय : डोंबाइच्या देउळाचा दक्षिणील' सिहाडा त्या सिहाडेयासि पिंपळ होता त्या पिंपळातळीं आसन :: डोंबाइ पश्चिमे आउसाची भेटि ::


यमळार्जुन । डोंबाइ उत्तरे पिंपळ त्या पिंपळा पश्चिमे पांडा ७ निंब : त्या निंबातळीं आसन: डोंबाइ उत्तरे पांडा १० दोन्ही यमळार्जुन निंब पिंपळ हे दोन्हीं एकें बुढें असति: 

त्यासि च्यान्ही सवा टेकौनि आसन होए ते दोन्हीं विसेखाचे : ते जळीनले होते : तयाची पात्रें केलीं : हे परशरामबा तेथचि वसोचें चरित्र हे रामेश्वरबा खडकावरी संगमीं आसन तेथ 

लखुबाइसां बुझावणी : ।: यमळार्जुना उत्तरे पांडा ६ वड : तेथ आसन त्यासि पश्चिमे पांडा १० कांटी : ते कांटीयेतळीं आसन तेथ मेंडुकाभीत स्त्रिये वरणभात एकी वासना 

यमळार्जुनातळीं वरणभात रुचि एकी वासना यमळार्जुनातळीं भोजनता : ।


भोजनता । यमळार्जुना इशान्यकोनी भोजनता दुरी खडकावरी भक्तिजनाचा भोजनसमै भोजनता पश्चिमाभिमुख आसन होए । बारसीचां दिसी जळक्रीडा :

तेथचि कपाटी पूर्वाभिमुख आसन त्याचि पुढां चास : तळसुता बहिर्वास वरौता खोउनि गोसावियांसी खडकावरी आसन जालें उदकांत लोंबता श्रीचरणी सिंपणेयाचे अनुकार 

सैंग खडक तिये मार्गी विसेख ३ । त्यासि पूर्वे ढगातळीं दुसरा पैलाडील भोजनता तेथ आसन  :|:


 3D video released...!!

  डोमेग्राम 3D video.

https://youtu.be/6p95z73yHCE