Skip to Content

caa/gadevapaUrI

 


चांगदेव स्थाने.
चांगदेव लीळा संदर्भ.

 

चांगदेवपुरी स्थाने

गुंफा | चांगदेवपुरीये गुंफे अवस्थान : दिस २० : शोध : हे रामेश्वरबा : एकी वासना सप्तरात्री तथा पंचरात्री ' चांगदेवाचिये जगतीभितरी नैऋत्यकोनी पौळीसी मढु पूर्वाभिमुख' : 'तेथ अवस्थान' : 

उजवेया हाता एकी देउळी पूर्वाभिमुख : डावेया हाता एकी देउळी : एकी निळकंठाचि : एकी लिंगाचि पूर्वाभिमुख : दोहीं देउळीयामध्यें मढ पूर्वाभिमुख : देउळीया नमस्करीये नव्हति' : 

मढाचे उत्तरे एकी वासना मढाचा आंगणी मादनें :

चांगदेवाचे देऊळ । 'चांगदेवाचे देउळ पूर्वाभिमुख : मंडपाचे तिन्ही दारवठें: एकु पूर्वाभिमुख : एकु उत्तराभिमुख : एकु दक्षिणाभिमुख ' : चौकीं आसन : पौळीचे दोनि दारवठें : एकु पूर्वाभिमुख : 

पाइरीया १० : पुढें आणिकी पाइरीया संगमा जातां १४ आहाती : दुसरा दारवठा दक्षिणाभिमुख' : पाइरीया ६ : सोंडीया २ : दक्षिणेचेया दारवठाहुनि 'भितरी रिगतां पूर्विलीकडील उजवेया हाताची " सोंडी : 

तेथ गीताचा प्रसंगु सोंडीवरी गोसावी दक्षिणाभिमुख चरणचारी उभे

असति : तेथ कवीडींभा भेटि :

एकी वासना हाटवटीयेहुनि येत होते 'तेथचि' चांगदेवा दक्षिणे दारवठाहुनि सैंग उत्तर-दक्षिण हाटवटी एकी पूर्व-पश्चिम हाटवटी मध्ये चौबारें चांगदेवाचिये जगतीची खिडकी पूर्वाभिमुख तिकडेची परिश्रय


चक्रतीर्थ, वराहदेव, संगमेश्वर । "तप्तीचिये थडीये चक्रतीर्थ होते तेथ वहारदेवो होता : देउळी पश्चिमाभिमुख तप्तीचा आणि "पयोष्णीचा' 'संगमी खांबु होता तया खांबापासी आसन पश्चिमाभिमुख: 

संगमेश्वराचे देउळ पूर्वाभिमुख: पौळीचा दारवठा पूर्वाभिमुख: पौळीबाहिरी दक्षिणाभिमुख दंडवत " "घालिजे " :

| नगरासी दावठें २: एक पूर्वाभिमुख एक दक्षिणाभिमुख : तो चिरेबधु 1: शोध : नगराचा पूर्विल दारवठा एकी वासना त्यासी उजवेया हाताच तवं कवीडींभ सोडीयेवरी गोसावी दक्षिणाभिमुख चरणचारी

उभे असति : तव काविडीम्भ गंगेकडून येत होता एकी वासना गुंफेकडौनि येतु होता : तेयासि भेटि जाली' : चतुर्मुखाचे देऊळ । नगरा पूर्विला दारवठेया अज्ञे चतुर्मुखाचें देउळ पूर्वाभिमुख

"सुकनासीसि च्यारी द्वारें दोनि आडवांगी च्यारी च्यारी देउळीया: पौळीचा दारवठा पूर्वाभिमुख : एकी वासना गावासी दक्षिणे चतुर्मुखाचे देउळ पूर्वाभिमुख : तेथ विहरणस्थान : 

एकी वासना तिकडेचि परिश्रय " " चतुर्मुखाचे देउळाउत्तरे गावचे नगरमहाद्वार पूर्वाभिमुख' : गंगातीरीं वाळवंटीं संगमी आसन : एवं चांगदेव ॥


 3D video released...!!

  चांगदेवपुरी 3D video.

https://youtu.be/_GczFX7bd5E