Skip to Content

pa/caaLeSvar

 

पंचाळेश्वर overview.
पंचाळेश्वर स्थाने.
पंचाळेश्वर लीळा संदर्भ.

 

पांचाळेश्वर स्थाने

गुंफा । गावा वायव्यकोनी गंगेचिये थडीये श्रीदत्तात्रेयप्रभूंची गुंफा उत्तराभिमुख' :: 

पांचाळेश्वर | पांचाळेश्वरीं 'रिगतां डावेया हाता चौकीं अवस्थान: दिस ५ : एकी वासना दिस ७ : पांचाळेश्वराचें देऊळ पूर्वाभिमुख : पुढें उत्तर-दक्षिण पटिसाळ पूर्वाभिमुख : 

'तेथ उत्तरीली सिहाडां आसन : तेथ जोमाइसां वैजाइसां भेटि : ते पटिसाळेचे उत्तरीले सिरां रिगतां उजवेया हाता 'सगडी' : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : दारवठेयापुढां पांडा १०

राजलादेवीचें देउळ : तेथ आसन : दारवठेंया बाहिरी रिगतां उजवेया हाता निंब हे रामेश्वरबा : दारवठेंयाआंतु रिगतां आंगणी डावेया हाता निंब हे परशरामबा : 

पाइरीया आंगणी मादनेंस्थान चौकीं अवस्थान : दक्षिणेचे भिंतीसीं भिड़ीं पिंपळ : तयातळीं आसन : पिंपळापूर्वे 'पौळीसी' चौंडा रायाचें द्रव्य स्थान : सात बरी पूर्वाभिमुख दाखवणें :

जगतीबाहिरी इशान्यकोनी सातै घट : जगतीआंतु रिगतां उजवेया हाता देउळा इशान्ये मल्लीनाथाची देउळी : एकी वासना लिंगाची देउळी पूर्वाभिमुख : तेथ आसन : 

आरोगणा जाली : : देउळीये मर्दना : आंगणी मादनेंस्थान' : जगतीआंतु रिगतां उजवेया हाता वेदिका : तेथ आसन : तेथ जोमाइसां भेटि : एकी वासना एकाइसां भेटि : 

उपाध्यां भेटि : वेदिकेपुढां अग्निष्टीका : तथा उत्तरेचे जगतीबाहिरी उत्तरे समिपचि अग्नीष्टीका पूर्वाभिमुख : तेथ आसन : पांचाळेश्वराचे जगतीची खिडकी पूर्वे " : तिकडेची परिश्रय' 

वेस, पिंपळ । गावा उत्तरे वेसी : वेसी उत्तरे पिंपळ : तेथ आसन पूर्वाभिमुख पिंपळा पश्चिमे पांढरी पिवळी दांडी कथन :


गुंफा । गावा इशान्ये गंगेचिये थडीये पिंपळ : तयातळीं आसन : पिंपळापूर्वे अग्नीष्टीका पूर्वाभिमुख तेथ आसन अग्नीष्टीके उत्तरे दरडीखाली दरडीसीचि गुंफा करवणें : 

उत्तराभिमुख : तेथ अनंतनायका भेटि : तेथचि संपूर्ण सोमवारी गुंफेचे आंगणी मादनेंस्थान :


भोजनता । पिंपळा इशान्ये गंगेआंतु भोजनता : तेथ आसन : तेथचि शुक्र कथन :

विश्वनाथ देवता । गावा पूर्वे इशान्यकोना आश्राइत थडीयेसि निंब तेथ विश्वनाथ देवता : तेथ आसन एवं पांचाळेश्वर ।।


अवधुत स्कंधारोहण । दरडीखाली गुंफा : आंगणी मादनेंस्थान : आंगणी अवधुताचेया खांदावरी आरोहण करुनि भोजनतया बीजें करणें : महाद्वारा वायव्ये गंगेतु ढगु : तेथ अवधुताचेया खांदावरी आरोहण करुनि गंगा उतरणें': ।।

बळहेग्राम भोजनता । अवधुतास्कंदीं आरोहण होउनि गंगेपैलाडील भोजनतेयासि गोसावी बीजें केलें : तेथ आसन जालें तैसेचि हिरण्यपूरीयेसी बिजे केले: ।।


बळ्हेग्रामापूर्वे गंगेआंतु खडकावरी आसन शुक्र दर्शनी ज्योतीष प्रशंसा : खडक घालौनि पांचाळेश्वरीचीं स्थानें २४ : ।।


 3D video released...!!

  पांचाळेश्वर 3D video.

https://youtu.be/JT7ceHNHzBw