Skip to Content

ravasagaava

 

रावसगाव oveview. 
रावसगाव स्थाने.
रावसगाव लीळा संदर्भ.

 

रावसगाव स्थाने


संगमेश्वर । रावसगावीं सिद्धनाथी संगमेश्वरी अवस्थान : संगमेश्वराचें देउळ पूर्वाभिमुख चौकीं आसन : चौका पूर्विले भिंतीसीं वोटा उत्तर-दक्षिण पश्चिमाभिमुख : तया वोटेयावरी 

अवस्थान : संगमेश्वरा नैऋत्यकोनी एकी वासना पश्चिमे सिद्धनाथा दक्षिणे आबाइसाची गुंफा उत्तराभिमुख : एकी वासना पश्चिमाभिमुख: पुढें आंगण' : आंगणी मादनेंस्थान :


सिद्धनाथ । संगमेश्वरा उत्तरे जगतीआंतु सिद्धनाथाचें देउळ पूर्वाभिमुख : चौकीं आसन : दोन्ही दारशंका: सिद्धनाथ आबाइसां भेटि : उमाइसां भेटि :

महादेव पाठकाची गुंफा । सिद्धानाथा वायव्ये एकी वासना उत्तरे पश्चिमेचे भिंतीस उत्तरेचे सिरां जगतीआंतु महादेवपाठकाची गुंफा पूर्वाभिमुख : गुंफे कामाइसां अष्टमंगळा 

नामकरण: जगतीसी दारवठें २ एक उत्तराभिमुख : एक पूर्वाभिमुख देउळा इशान्ये एकी वासना अज्ञे परिश्रय: : जगतीबाहिरी वायव्यकोनी गंगेचिये थडीये पव्हेयांतु वसति :

| सिद्धनाथा दक्षिणे वड त्या वडातळीं चरणचारी गोसावी उभे असति : तेथ बोणेबाइया गोसावियांसी अरोगणा दिधली तेथचि खिडकी :


रामनाथ, नरसिंहमढ । रामनाथीं नरसिंहीं अवस्थान दिस ९ एकी वासना ५: रामनाथाचिया वडाखाली काळदासभटां भेटि गोसावियांसी पैलाडी जावयाची प्रवृत्ती म्हणौनि गोसावी 

ऐलाडील वडवेही' बीजें केलें तवं वोती उतारु नाही म्हणौनि गोसावी नावेक उभे होते मग गोसावी वोता वरीलिकडे उतरले मग गोसावी रामनाथासि बीजें केलें


रामनाथाचें देउळ उत्तराभिमुख : एकी वासना पूर्वाभिमुख : जगतीसि दावठें २ : एक उत्तराभिमुख : एक पूर्वाभिमुख : एकी वासना : पूर्वे परिश्रय जगतीआंतु रामनाथा अज्ञे एकी 

वासना दक्षिणे नरसिंहमढ पूर्वाभिमुख भितरी दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा उत्तराभिमुख तया वोटेयावरी अवस्थान दिस १० : पुढें उत्तर - दक्षिण पटिशाळ पूर्वाभिमुख : 

आंगणी मादनेंस्थान नरसिंहा पश्चिमे आसन :


लळीताइसा काळस्फोट । रामनाथा नैऋत्यकोनी एकी वासना पश्चिमे लळीताइसां काळस्फोट  ंरक्षण : एकी वासना जगतीआंतु वायव्यकोनी देउळी पूर्वाभिमुख : 

तेथ काळस्फोट लळीताइसां रक्षणें : जगतीचे अज्ञकोनी उपहारालागी विनवणें : वोत, वड, घाट, वाळवंट । उत्तरेच्या दारवठेयाबाहिरी पांडा १० वोत त्या वोताचे कांठी वड : 

त्या वडाखाली आसन तेथचि वोती उमाइसातें आश्वासनें : तेथचि सोभागा भेटि : तेथचि उमाइसां निराकरणें : तेथचि वैजो भ्रिंगी नामकरण : थडीये पश्चिमे घाट : ते घाटीं आसन: 

सिद्धानाथा पश्चिमे वाळवंटी आसन : एवं रावसगाव : ।।


 3D video released...!!

  रावसगाव 3D video.

https://youtu.be/o-5V6MgjgDs