va&Ydasa/gama
महानुभाव पंथीय 'वृद्धासंगम' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक सचित्र आलेख नकाशा.


वृद्धासंगम (जोगेश्वरी) स्थाने
गुंफा । जोगेश्वरीये गुंफे अवस्थान जालें : दारवठेया उत्तरे देउळ : त्या देउळामागें भीडीं आसन : तवं गुंफा उघडविली : ते गुंफा जोगेश्वरी मागें दक्षिणेचे भिंतीस सैंग पूर्व-पश्चिम
पटिसाळ उत्तराभिमुख : तिचे पश्चिमिले सिरां गुंफा पूर्वाभिमुख : दुसरी जोगेश्वरी अज्ञकोनी गुंफा उत्तराभिमुख पुढा गुंफेचे पटिसाळे आसन : भितरी पूर्वेचे भिंतीसीं उत्तर-दक्षिण
वोटा पश्चिमाभिमुख : तया वोटेयावरी अवस्थान आखाड शुद्ध एकादशी पासौनि भादवा शुद्ध एकादशी हे मास दोनि अवस्थान : पूर्वेचे गुंफेसि : हे परशरामबा : पश्चिमेचे गुंफेसि :
हे रामेश्वरबा : दोहीं गुंफाचे उंबरे कवाडें : माजिघर: दोहीगुंफामाजी पटिसाळ उत्तराभिमुख तेथ विसेख ३: दोहीं गुंफासि वावणी । पूर्वाभिमुखे गुंफेचें पश्चिमेचे भिंतीसीं वावणें ।
उत्तराभिमुख गुंफेचें पूर्वेचे भिंतीसीं वावणें : जगतीचा दारवठा उत्तराभिमुख :: दारवठेया पुढें शस्त्रधरणी आवेशु : ।:
जगतीबाहिरी पश्चिमे वड त्या वडा पश्चिमे दहन : एकी वासना जगतीपूर्वे वोत: ते वोती दहन :: गुंफेचे आंगणी मादनें : : गुंफेसि विसेख १३ : गुंफे रंगपूजा : हे परशरामबा :
संगमेश्वरी : हे रामेश्वरबा संगमेश्वर । संगमेश्वराचें देउळ पूर्वाभिमुख गाभारा नासि चौकासी द्वारें २ : एक उत्तराभिमुख : एक पूर्वाभिमुख : चौकीं आसन : विहारु : तेथ विसेख ७ :
लिळा ३ : उंबरा : कवाडें पाइरीया ६ सोंडीया २ संगमेश्वरा उत्तरे वडु : तया वडाखाली आसन तेथ आउ नमस्कारु : तेथ आउ अंब्रभोजन तेथचि आउसां शुची अशुची म्हणणें :
जोगेश्वरीचें देउळ उत्तराभिमुख चौकाआंतुनि चौकीं रिगावा: पाइरीया तीन भितरी रिगतां डावेया हाता आसन गुंफे आउ गोरक्ष 'फोकरवणें': ।
देउळा उत्तरे परिश्रय एकी वासना पश्चिमे परिश्रय एकी वासना पूर्वे परिश्रय: ।
3D video released...!!