baelapa]r
महानुभाव पंथीय 'बेलापुर' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक सचित्र आलेख नकाशा.



बेलापूर स्थाने
सिद्धनाथ । बेलोपुरी सिद्धनाथ अवस्थान दिस ३ तथा ४: एकी वासना १५ : एकी वासना ५: पेहेरे पश्चिमे गावा पूर्वे सिद्धनाथाचें देऊळ पूर्वाभिमुख : तें महाविस्तीर्ण :
चौक थोर पघळ घटाकृत ते चौकीं अवस्थान तेथ नित्यदिनी पूजा आरोगणा' : चौकाचा उंबरा पुढां समग्र आंगण पिटावणेचें : जगती पैस आगळी दारवठा पूर्वाभिमुख पाइरीया ४।५ । देउळा पुढें साजें :
: । ।: जगतीआंतु देउळें तीन सोमनाथाची देउळी पूर्वाभिमुख : आंगणाचें उत्तर विभाग बहिरवांची देउळी दक्षिणाभिमुख तेथ आसन विहारु विहारु तेथ दुपाहारीची आरोगणा,
पूजा होए : मल्लीनाथाची देउळी दक्षिणाभिमु सोमनाथाचें आंगणी मादने उत्तरे खिडकी तिकडेचि परिश्रय जगतीबाहेरी इशान्यकोना समिपचि थडीयेसि लिंगाची देउळी
पूर्वाभिमुख पाइरीया ३ : तेथ पूर्वाभिमुख आसन होए : जगतीबाहिरी लिंगाची देउळी एकी वासना सोमनाथाची देउळी : ते देउळीपुढें वड त्या वडापुढें मल्लीनाथाची देउळी
पश्चिमाभिमुख : चौकीं आसन रिगतां डावेया हाता पाइरीया ८ : ।: वनदेव । बनामध्यें वनदेवाचें देउळ पूर्वाभिमुख: खांबा १६ वरी उभविलें : जोतें तीं थराचें पाइरीया ३
पटिसाळ उघडी १० एकी वासना ३ : आंगणी वेढे पूर्वाभिमुख : देउळा पश्चिमे भिडीं आसन कोनी परिश्रय: ।
आदित्य । बेलोपुरीं आदित्यीं अवस्थान मास ३ एकी वासना २: गावा पश्चिमे पेहेरे उत्तरे मळा: शोध तो वोळत गावांतुल मळा ते मळा निंबादित्याचें देउळ पूर्वाभिमुख :
त्याचा उंबरा : भितरी चौकीं अवस्थान मास ३ हे रामेश्वरबा भितरी दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा उत्तराभिमुख तेथ अवस्थान मास ६ : तेथचि साकर वाढणें पुढें आंगण
उत्तर-दक्षिण ते आंगणी वेढे : आरोगण वाउली : : आंगणा उत्तरे उत्तर विभाग आसन उत्तराभिमुख कदाचित पूर्वाभिमुख : तेथ लिळा विसेखु तीन |
देउळा पुढें साजें ते साजां पाइरीया ४ : देउळाचे दारी सोंडीया दोनि उत्तर-दक्षिण : पाइरीया ४ : उत्तरेचे सोंडीयेवरी आसन : तेथ म्हाइंभटां अन्यव्यावृत्ती निरुपण :
तेथचि म्हाइंभटां भेटि हे रामेश्वरबा : पूर्वाभिमुख हे परशरामबा : सोंडीयेवरी दायंबा भेटि तेथचि भटोबासांसि एकलेपणानुवादु : तेथचि आउ म्लेंछ अवतारु । भटोबासां राहावणें :
दक्षिणीले सोंडीवरी आसन : तेथ विसेख ३ : आंगणी मादनें ।
देउळा इशान्ये आंगणी वृंदावन : वृंदावना दक्षिणे लघु परिश्रय: 1: बोचरी धानाइसां कमळाइसाचिया वासना देउळासि भिंतीची' पौळीचा दारवठा पूर्वाभिमुख:
दारवठेयाआंतुनि निगतां उजवेया हाता पांडा ५ निंब त्या निंबा उत्तरे माहादाइसां भेटि :: उत्तरेचे पौळीसि देउळी पूर्वाभिमुख तेथ आसन तेथचि महादाइसी मर्दना मादनेंयाचे
'विनविले' :: आदित्यामागें भिडीं आसन तेथ न्हानियेचा विसेख : देउळा उत्तरे गरुडासनि वज्री घडीतां महादाइसीं पाहाणें : तेथचि आरोगणेची विनति : देउळा उत्तरे पौळी बाहिरी
दुसरा निंब त्यासि कौनि पूर्वाभिमुख आसन होए पश्चिमे जगतीची खिडकी तिकडेची परिश्रय: । निंबातळीं म्हाइंभटां द्रव्य अनुज्ञा एकी वासना तेथ महादाइसां भेटि निरुपण :
वर्तत वांती कथन : निंबा पश्चिमे आसन पश्चिमाभिमुख तेथ विसेख १५ : देउळा अज्ञे दुसरा मळा: तेथ आसन : विहार : 1:
देउळा दक्षिणे वोत त्या वोता पैलाडी दक्षिणे पेहेरेचे कांठी पिंपळ : त्या पिंपळातळीं आसन : तेथ महादाइसें नदी आंतुनि येते होति : डोइये वस्त्रांचिया घडीया : हातीं भरली
सागळ ऐसी आली : गोसावियांसि दंडवतें घातलीं श्रीचरणा लागलीं : पिंपळा उत्तरे एकी वासना पश्चिमे भटां महादाइसां प्रकोप भटां महादाइसां दुसरेनि कोपणें :
पिंपळा दक्षिणे वाळवंटी आसन : तेथ महादाइसां निरुपण । एकी वासना देउळा नैऋत्यकोनी परिश्रय: : देउळाचे मागीले पौळीसीं उदका विनियोग:।
आदित्याचें दळवाडे वोळतगाविचे पारी पडीलें असे ।।
आमुचेया गोसावियांची केळी दों ठाइ सोभागा केळे : जोमाइसांचा नृत्य : निर्हेतुक ते केळी : हेतुसहित त्या क्रीडा । पेहेरेचा घाट पश्चिमे : ते घार्टी पिंपळ : त्यातळीं आसन :
तेथचि निरुपण होए ।।
3D video released...!!