baLhegaaXma

बळहेग्राम स्थाने.

बळहेग्राम स्थाने
सत्यादेवी, लिंगाची देउळी । बळ्हेग्रामी गुंफे अवस्थान शोध सत्यादेवी गुंफे अवस्थान: दिस २० : बळग्रामी गावा दक्षीणे सत्यादेवीचें देउळ पूर्वाभिमुख : दोन्ही द्वारशंका धरुनि
गोसावी भितरी अवलोकीलें : एकी वासना चौका पश्चिमे सत्यादेवी : 'मंडपाबाहिरी' 'आंगणी चाटेया आव्हाणी आगाधत्व' : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : आंगणी लिंगाची देउळी
उत्तराभिमुख : तेथ नावेक आसन एकी वासना सत्यादेवी इशान्ये लिंगाची देउळी : तिचे चौकीं आसन : सत्यादेविचें आंगणी हटें राक्षेयाचा नमस्कार घेणें :
गुंफा । सत्यादेवी वायव्यकोनी जगतीआंतु गुंफा पूर्वाभिमुख : पुढें उत्तर-दक्षिण पटिसाळ पूर्वाभिमुख : एकी वासना गुंफा उत्तराभिमुख : पुढें पूर्व-पश्चिम पटिशाळ उत्तराभिमुख :
पटिसाळेवरी उजवियाकडे आसन
गुंफेआंतु वोवाळणी : एकी वासना पटिसाळे वोवाळणी : गुंफे भितरी रिगतां डावेया हाता दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा तया वोटेयावरी अवस्थान दिस २० :
एकी वासना दिस १५ : गुंफे दक्षिणीली आडवांगी आंगणी मादनेंस्थान : दृष्टांतद्वारें उपाध्यां नाथोबा संबोखु : गुंफे मागें परिश्रय' : एकी वासना गुंफे वायव्ये परिश्रय : सत्यादेवी उत्तरे
खिडकी : एकी वासना गुंफे पूर्वे खिडकी' :
ब्राह्मणाचा आवार । सत्यादेवी वायव्ये ब्राह्मणाचा आवारु उत्तराभिमुख : पूर्व-पश्चिम पटिसाळ उत्तराभिमुख : पटिसाळेचिये उजवियेकडे आसन :-
महालक्ष्मी । सत्यादेवी नैऋत्ये 'कोनी' महालक्ष्मीचें देऊळ पूर्वाभिमुख: चौकीं आसन : दि२ वेसीपासी गावांतु रिगतां डावेया हाता महालक्ष्मीचे देउळ पूर्वाभिमुख : गाविचें वेसदार दक्षिणाभिमुख
सांडल्या मांडल्या । सत्यादेवी नैऋत्यकोनी कोनी पांडा १० सांडल्या मांडल्या कथन :
ब्रह्मनाथ । सत्यादेवी नैऋत्येकोनी गावा बाहिरी गंगेचिये थडीये ब्रह्मनाथाचें देउळ पूर्वाभिमुख: तेथ चौकीं आसन : कामाइसां पंचनामकरण' : तिकडेची ब्रह्मनाथा नैऋत्यकोनी
पिवळदरडी पूर्वे" मांडव खडक : तेथ मांडवी कथा निरुपण" : त्यासि पश्चिमे पिवळदरडी : त्यासि पश्चिमे डोणी: पिवळदरडी घालुन बळग्रामी स्थानें १४ : ।।
3D video released...!!