BaDgaava


भडगाव स्थाने
• सिवाळे । भडेगावीं अवस्थान गावा उत्तरे वाहाळे पैलाड़ी थडीयेसी दोनि ताड : त्या ताडा दक्षिणे गावा इशान्ये सिवाळें पूर्वाभिमुख : तेथ अवस्थान जालें : दिस ३ :
जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : उत्तरे परिश्रय : सिवाळें रचमचेचें स्थान म्हणौनि गोसावी पाडवेयाचां दिसीं सिवाळाहुनि बीजें करीतां पुढें कासार वाडयातुनिं जातां मार्गी गावासि पश्चिमे ताडासि पूर्वे
होळी : ते होळीयेपासि गोसावी बीजें केलें :
वसइ । गावांतु वसैया २ पूर्वाभिमुख : ते उत्तरेचे वसैयेसि अवस्थान : दिस ७ : एकी वासना मास १ : शोध : दिस २० : दोहीं वसैयासि पटिसाळ एकीच उत्तर-दक्षिण पूर्वाभिमुख : ते पटिसाळेसि आसन :
जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : दक्षिणेची वसै ते विहरणाची : तिचे आंगणीची गारी बुजवणें : आंगणी मादनेंस्थान : एकी वासना पुढिले मार्गिची गारी बुजवणें :
एकी वासना गावा नैऋत्यकोनी वसै : तिचे पटिसाळे उजवियेकडे आसन : तेथ महात्मा - नामपूर्वक कुमारी खाजें देववणें : वसैयेपुढें पिंपळ : तेथ स्त्री प्रदक्षिणा : पिंपळातळीं आसन :
वसैये उत्तरे परिश्रय : एवं भडेगाव ': ।।
3D video released....!!