FLapaUr (vaerUL)


3D video released...!!
एळापूर स्थाने
राजविहार । एळापुरी राजविहारीं अवस्थान : एळापुरीचा घाट उतरतां उजवेया हातां थोरला राजविहारु पश्चिमाभिमुख : तयाचे तिसरां खणी 'जाता डावेया हाता' माचा पाषाणाचा :
तया माचेयावरी अवस्थान दिस ३ : माचेयावरी आसन होए : चरणक्षाळण होए : पहुड : उपहुड : गुळळा विडा होए : पूजा आरोगणा होए : मागुता गुळळा होए :
ऐसे तिन्हीं अवसर माचेयावरी होति : तियेची उत्तरेचिये वोवरीयेसि आरोगणा होए : तिहीं पटिसाळां वेढे करीति : माचेया नैऋत्यकोनी खांबेसीं उत्तराभिमुख मादनेंस्थान :
माचेया पश्चिमे दारवठा : तियाचि पाइरीया दुसरीये पटिसाळे नैऋत्यकोनी पश्चिमाभिमुख दारवठा : तियाचि पाइरीया : पश्चिमे परिश्रय : राजविहारी स्थानें ११ :
मग घोर शब्द निमित्तें गोसावी तेथौनि बीजें केलें
चतुर्वेद्य मठ । आवघीं देउळें पाहात पाहात : एकी वासना : अवघीं लेणी पाहात पाहात मग विळचां गोसावी चतुर्विधाचेया मढासि बीजें केलें :
गावा उत्तरे दुरी चतुर्विधाचा मठ पूर्वाभिमुख : त्या मढाचे आंगणी गोसावी चरणचारी उभे असति : आणि सर्वज्ञे म्हणितलें : “बाइ : हें बिढार होए : " तवं बाइसी म्हणितलें : “हो बाबा ! हे बिढार होए :
" मग गोसावियांसी तेथ अवस्थान जालें मास ९ दिस २४ : एक म्हणेति मास १०:
दोन्हीं मढ पूर्वाभिमुख एकी वासना उत्तरेचा मढ उत्तराभिमुख: दक्षिणे' चतुर्विधाचा मढ पूर्वाभिमुख : भितरी दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा उत्तराभिमुख : तया वोटेयावरी अवस्थान जालें :
तिन्हीं अवसर होति : पहुड : उपहुड होए : आरोगणा होए :
वोटेयावरी उपाध्यां भेटि : देवां भेटि : राक्षेया लक्ष्मींद्रभटां भेटि : बागडेया विष्णुभटां भेटि : जपियां विष्णुभटां भेटि : आपदेवभटां भेटि : जनक नरसिंहभटां भेटि : पदकर नागदेवोभटां भेटि :
दायभागवतां भेटि : रवळो भेटि : गोंदो भेटि : नाथोबा भेटि : गातीया कमळनायका भेटि हे बळ्हेग्रामकर महाजन मढाचा उंबरा : कवाडें : 'बाहेरीली पटिसाळे रिगतां डावेया हाता पूर्व-पश्चिम वोटा तेथ
दोंपाहारांचा पहुड : तेथचि निरुपण * : तेथचि वेढे :
पटिसाळेसी आपदेवभटांसि भेटि' : सारंगपंडिता भेटि सांतिबाइसां भेटि : एकाइसां भेटि : देमाइसां भेटि मोकानंदा भेटि साळीवाहना भेटि विद्यावंता भेटि : संतोषा भेटि : गोपाळपंडिता भेटि या १० भेटि पटिसाळेसि : पटिसाळेसि पुढां मढाचिया पाइरीया ४: सोंडिया दोनि रिगतां उजवेया हाताचिये सोंडियेवरी पाणीभात आरोगणा : दक्षिणेचे सोंडियेवरी आसन: । पुढां आंगण : आंगणी मादनेंस्थान : तेथचि वेढे : 'तथा भक्तिजनासि खेळु समग्र पटिसाळे वेढे : । :
मढ दुसरा : दुसरीया मढाचा उंबरवट : कवाड : बाहेरी पटिसाळेसी दक्षिणीले सिहाडेनसीं आसन तेथ सांतीबाइसाची दुसरी भेटि पटिसाळे वेढे : पुढा पाइरीया ६ : सोंडिया २ :
दक्षिणेची सोंडि ते विसेखाची । दोहीं मढाचां संदी उभयां राहुनि उपाध्यां रोटीया भाजितां द्रीढ पुरुष नामकरण : उत्तरेच्या मढा इशान्ये लिंगाची देउळी : तेथ आसन ।
मढा इशान्ये दुरी डोंगराजवळी" श्रीप्रभृ दाखवणें । मढा अज्ञे परिश्रय एकी वासना मढा पश्चिमे परिश्रय: । जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : पश्चिमे खिडकी तीस सोंडिया २ : ।:
दारवंठेयापूर्वे पांडा ६ विहिरी : तिचा रिगावा उत्तराभिमुख : ते विहिरी- चौबारी शोध : विहिरीचिये पश्चिमिले रवणीयेवरी आसन : तेथ पाणीभातु 'वासना' सोंडियेवरी :
विहिरीपूर्वे शांतिबाइसाकरवी बोरी बाभुळ सिंपवणें : विहिरीपूर्वे पांडा १० चांगदेवभटां निरुपण वंध्य दिवसु कथन : मढासि दक्षिणे चांगदेवभटां अनुवर्जन : मढांमागां लवणी परिश्रय